माझी शाळा
जि. प. प्रा. शाळा खळवाडी ता. संगमनेर जि. अ. नगर
जि. प. प्रा. शाळा खळवाडी ता. संगमनेर जि. अ. नगर हि शाळा संगमनेर तालुक्यापासून २७ किमी अंतरावर चिंचोली गुरव गावातील शाळा असून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणारी शाळा आहे. शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे सहकार्याने विविध उपक्रम राबविले जातात. शाळेत लोकसहभागातून ऑडिओ सिस्टीम, वृक्षारोपण, शाळेसाठी संगणक उपलब्ध करून दिले आहेत. शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून दोन्ही शिक्षक मेहनती आहेत. लवकरच शाळा डीजीटल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असून त्यात लवकरच यश येइल. शाळेत सन २०१२-१३ मध्ये मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह झाले असून सध्या किचनशेडचे काम सुरु आहे.शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेपुर्वी मार्गदर्शन केले जाते. शाळेतील शिक्षकांनी स्वतः स्लाईड तयार केले असून वर्गात ई - लर्निंगचा वापर करून अध्यापन केले जाते. सध्या शाळेतील इयत्ता १ ली व २ री चे वर्ग सेमी इंग्रजी असून नैसर्गिक वाढीने त्याची वाटचाल चालू राहील.सरपंच मा. सौ.विमलताई आभाळे यांचे शालेय प्रगतीच्या दृष्टीने विशेष योगदान लाभले आहे.
आमचे शाळेला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
. . धन्यवाद!
No comments:
Post a Comment